श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना तथा श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळ्यानिमित्त शेंबा येथे भव्य शोभायात्रा व दिंडी सोहळा संपन्न*
शेंबा (नांदुरा): अयोध्येत झालेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित शेंबा येथे दि.22 रोजी श्रीराम प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. श्री लक्ष्मी नारायण मंदिरात आकर्षक फुलसजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिरात पुष्पवृष्टी करण्यात आली. सायंकाळी 6.30 दरम्यान दीपोत्सव साजरा करण्यात आला. शेंबा येथील मंदिर सुद्धा आकर्षक अश्या फुलांनी सजवण्यात आले.मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संध्याकाळी दिंडी सोहळा गावातून मुख्य रस्त्याने काढण्यात आला होता. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण श्रीराम भूमिकेत कु. प्रतिक्षा शशिकांत भोपळे, सीतेच्या भूमिकेत कु. दिव्या कैलास हरणे, लक्ष्मणाच्या भूमिकेत शिव महादेव जुमडे हे होते.मुख्य रस्त्यावर रांगोळी काढून दिंडीचे व शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी गावातील सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री लक्ष्मी नारायण मंदिर, मारुती मंदिर,श्री खंडोबा मंदिर व गावातील मंडळाने श्रींची आरती , प्रसादाचे आयोजन केले होते.सायंकाळी गावातील मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. घरोघरी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सर्वत्र हर्ष उल्हास व आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमाला विर सावरकर मित्र मंडळ, गुप्तेश्वर आश्रम शेंबा, जय बजरंग मित्र मंडळ, ग्रामपंचायत, गावकरी मंडळी शेंबा सर्वांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात होते.