महाराष्ट्र हादरला! शाळेच्या टॉयलेटमध्येच बालवाडीत शिकणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार
परभणी: बदलापूरमध्ये दोन चिमुरडीवर अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असताना अशीच एक धक्कादायक घटना परभणीत घडली आहे.
इंग्रजी शाळेत बालवाडीत अर्थात एलकेजीत शिकणा-या विद्यार्थिनींवर अत्याचार झाला आहे.शाळेतील स्वच्छतागृहातच तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मुलीची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे…अल्पवयीन मुलगी इंग्लीश स्कूलमध्ये बालवाडीला शिकत आहे. 5 ऑक्टोबरला सायंकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी आल्यानंतर मुलीला सरळ बसता येत नव्हते. आईने चौकशी केल्यावर पिडितेच्या अंगावर ओरखडे दिसून आल्यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आले.
या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मुलीवर अत्याचार झाल्याचे पुढे आलंय.. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलंय..या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात पोक्सो सह इतर कलमाखाली आरोपीवर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.