मलकापूर: पाच वर्षा आधी बोललो होतो मतदार संघातील कुणावरही पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, अन् मला तसा विश्वासही आहे की जे बोललो तेच केलं किंबहुना जे बोललो ते केलं नाही असं कधी झालं नाही आणि भविष्यातही होणार नाही.
ही पाच वर्ष तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ दिला नाही, त्यामुळे येत्या निवडणुकीतही असाच विश्वास माझ्यावर कायम असू द्या असे आवाहन करीत भविष्यातही मी या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला केंद्रबिंदू मानेल अशी ग्वाही दिली.
विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पंडितराव एकडे यांच्या अथक प्रयत्नातून विविध विकास निधी अंतर्गत ११९ कोटी ३७ लक्ष रुपयांच्या विकास कामांचा भुमिपूजन व लोकार्पण समारंभ आज ७ सप्टेंबर रोजी मलकापूर तालुक्यातील वाघुळ, वडोदा, पान्हेरा, बहापुरा, कुंड खु., कुंड बु., धरणगाव, झोडगा, अनुराबाद, हरसोडा,काळेगाव, नरवेल, म्हैसवाडी, तालसवाडा, तांदुळवाडी, वाघोळा, चिंचोल, दुधलगाव, रणथम, विवरा, शिवणी, भालेगाव, हिंगणाकाझी, देवधाबा, गोराड, खामखेड या गावांमध्ये विविध विकासात्मक कामांचा भूमिपुजन सोहळा संपन्न झाला.
महाविकास आघाडीचे समस्त नेते , सरपंच, उपसरपंच,पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी,प्रामुख्याने उपस्थित होते.