बुलढाणा:दिशा बचत गट फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. ग्रामीण महिलांना आत्मविश्वास देण्याचे काम जयश्रीताईंनी केले आहे, असे प्रतिपादन बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनीच्या समारोपीय कार्यक्रमात केले.
जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा येथे दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून तीन दिवसीय भव्य बचत गट प्रदर्शनीचे आयोजन केले होते. त्याचा समारोप काल पार पडला. यावेळी समारोपीय भाषणात भाईजी बोलत होते.या प्रदर्शनीमध्ये तळागाळातील महिलांची उस्फूर्त उपस्थिती लाभली. महिलांनी आणलेले गृह उपयोगी पदार्थ, खाद्य पदार्थांची रेलचेल, बचत गटाच्या महिलांचे विविध स्टॉल, त्यामध्ये झालेली करोडो रुपयांची उलाढाल पाहता ‘दिशाचे’ आयोजन कमालीचे यशस्वी ठरले.
यावेळी प्रदर्शनीमध्ये भाग घेणाऱ्या काही महिलांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी बचत गटाच्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.