डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर शेंबा येथे माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी
शेंबा (निलेश दाभाडे -नांदुरा):स्वतः झिजून सर्वांना मायेची साऊली देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती डॉ. बाबसाहेब आंबेडकर नगर येथे १२६ जयंती मोठ्या उत्साहात (दि.७) साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार शेंबा येथील नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समिती बांधकाम सभापती प्रवीण भिडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सम्राट नवयुवक मंडळ याच्या हस्ते माता रमाई च्या प्रतिमा फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली.
माता रमाईंनी भक्कम पाठबळ दिले म्हणूनच महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रोन्नतीत, सामाजिक कार्यात अतुल्य योगदान देता आलं. त्यांचं जीवन हे आजच्या स्त्रीशक्तीसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन जानराव भिडे यांनी केले.
यावेळी बोलताना मंगेश भिडे म्हणाले की, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीमध्ये व कार्यात रमाई यांचा त्याग व परिश्रम यांचे विस्मरण होता कामा नये. माता रमाई यांनी हलाखाची परिस्थिती असताना देखील काबाडकष्ट करून बाबासाहेबांना खंबीर साथ दिली.
माता रमाई जयंती निमित्त रमाई गीत गायनाचा कार्यक्रम समस्त बौद्ध बांधव याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला सुधाकर तायडे (मा.पो.पा.), बहादूर भिडे,वासुदेव भिडे, प्रभाकर भिडे,नागेश भिडे, अशोक भिडे, दिगंबर इंगळे, सुनील इंगळे, वसंत भिडे, नंदकिशोर भिडे तथा
प्रारंभीक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नांदुरा तालुका अध्यक्ष किशोर वाकोडे यांच्यासह समस्त बौद्ध बांधव,भगिनी, बालक,बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात बालिकांनी माता रमाईची वेशभूषा धारण केली होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रदीप भिडे तर आभार प्रदर्शन शेषराव दाभाडे यांनी केले.