धक्कादायक!नीतिमत्ता चालली कुठे?पत्नी गाढ झोपेत;वडिलांचा मुलीवर…
सातारा : मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना माण तालुक्यात घडली असून, पत्नी गाढ झोपेत असताना वडिलांनी १२ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्यातून मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
याप्रकरणी नराधम बापाला दहिवडी पोलिसांनी तातडीने अटक केली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १२ वर्षे नऊ महिन्यांची आहे. पत्नी गाढ झोपेत असताना वडील मुलीवर वारंवार अत्याचार करत होते. हा प्रकार तब्बल दोन वर्षांपासून सुरू होता. काही दिवसांपूर्वी मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. यानंतर मुलीकडे आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने हा प्रकार वडिलांनी केला असल्याचे सांगितले.
हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. दहिवडी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. ३०) दुपारी पत्नीने धाव घेऊन पतीच्या काळ्या कृत्याचा पोलिसांसमोर पाढा वाचला. त्यानंतर तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित नराधम बापाला तातडीने बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत.
… यामुळेच प्रकार उघडकीस
पीडित मुलीवर बापानेचअत्याचार केल्याने मुलगी भेदरली होती. याबाबत तिने कोठेही वाच्यता केली नाही. पत्नीला काही एक समजून न देता वडील मुलीवर सातत्याने अत्याचार करत होते. मुलगी गरोदर राहिल्यानेच हा प्रकार उघडकीस आल्याचे दहिवडी पोलिसांनी सांगितले.