छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती; तारीख, वेळ आणि महत्त्व जाणून घ्या..
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.
19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. दरवर्षी मोठ्या आतुरतेने शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट बघत असतात.महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. राज्य सरकारकडून १९ फेब्रुवारी या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते. या वर्षी, सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती साजरी करणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा इतिहास
१८७० साली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. नंतर लोकमान्य टिळकांनी जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली.लोकमान्य टिळक त्या काळात जनतेला सोबत घेऊन ब्रिटिश राजवटी विरुध्द लढा देत होते. याचाच एक भाग म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात सार्वजनिकरित्या साजरी करण्याचे आवाहन जनतेला केले. छत्रपती शिवाजी महाराजाचे शौर्य आणि योगदान जनतेला नेहमीच प्रेरणा देत राहो, यासाठी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते.