बुलढाणा
धरणात खोल पाण्यात पाय घसरून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू! मोताळा तालुक्यातील घटना..
मोताळा: तालुक्यातील निमखेड येथील संदीप बिचुकले (२५ वर्ष) या तरुणाचा निमखेड गावाजवळ असलेल्या धरणात बुडून मृत्यू झाला ही घटना दि.१८ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यानची आहे .
प्राप्त माहितीनुसार मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी निमखेड गावाजवळ धरणावर संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान संदीप गेला असता मेंढ्यांना पाणी काढत असताना तोल जाऊन पाय घसरून खोल पान्यात पडला संदीप ला पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात आई-वडील भाऊ असा मोठा आप्तपरिवार असून नीमखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.संदीपला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी बुलढाणा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.