बुलढाणा : अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला आहे. मात्र सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याने या विरोधात अंगणवाडी सेविकांनी सीटु संघट्नेतंर्गत मोताळा येथे धरणे आंदोलन केले.या आंदोलनादरम्यान राज्य सरकार व मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ज्यामध्ये संपूर्ण अंगणवाडी सेविका गेल्या एका महिन्यापासून संपावर असून त्यांच्या विविध मागण्यासाठी संप सुरु केला आहे. मात्र राज्य सरकारने अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे आता मुंबईच्या आंदोलना नंतर आता त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन चालू केले आहे. धरणे आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविका संघटना सीटू यांनी हे मोताळा येथील प्रकल्प कार्यालय येथे सीटू अंगणवाडी संघटच्या जिल्हा सचिव प्रतिभा पाटील यांच्या नेतूत्वात धरणे आंदोलन सुरु केले.
लढा सुरूच राहणार
धरणे आंदोलन ८ ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान सुरू राहणार आहे. जोपर्यत मागण्या मान्य होत नाही; तो पर्यंत असाच लढा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. यावेळी अंगणवाडी सेविका यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, आदिती तटकरे यांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी केली.धरणे आंदोलन ८ ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान सुरू राहणार आहे. जोपर्यत मागण्या मान्य होत नाही; तो पर्यंत असाच लढा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. यावेळी अंगणवाडी सेविका यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, आदिती तटकरे यांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी केली.