शेंबा (नांदुरा):नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा शेंबा बु:येथे राजश्री शाहू मल्टीस्टेट को.ऑफ. क्रेडिट सोसा. लि. बुलढाणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके यांच्या (वाढदिवस दि.१३मार्च) वाढदिवसानिमित्त दि.१२ मार्च रोजी राजश्री शाहू सोसायटी शेंबा शाखा व्यवस्थापक मॅनेजर- दिपक शेजोळे, अकाउंट मॅनेजर-महेश धोरण, शिपाई- गजानन आडे यांच्या वतीने १ ते ४ थी तील विद्यार्थी विद्यार्थिनींना वही, पेन वाटप करण्यात आले.
वाढदिवसा प्रसंगी अनाठाई, अनावश्यक खर्च टाळत शाळा उपयोगी वस्तू वाटप करण्यात आले.संदीप दादा शेळके हे नेहमीच समाज उपयोगी काम करत असतात. त्यांनी अनेक गरीब गरजू घटकांना आपल्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे.वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करत समाजाप्रती एक आदर्श उभा केला आहे.
यावेळी मुख्याध्यापक आय . एस. बालोद (सर )शिक्षक रमेश पाटील(सर), कुलकर्णी (सर), शिंदे (मॅडम), अढाव (मॅडम)शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर वाकोडे, मानव अधिकार नांदुरा तालुका उपसंघटक शिवानंद इंगळे आदी उपस्थित होते.