*श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महासोहळा उत्साहात..
खामगांव:संपूर्ण भारतात आज 22 जानेवारी रोजी राम दिवाळी साजरी झाली अयोध्या धाम येथे उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात प्रभु श्रीराम यांच्या मुर्ती ची प्राण प्रतिष्ठा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला 22 जानेवारी रोजी दुपारी पार पडलेल्या या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाची सर्व जन साक्षी झाले. श्री राम लला प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त अवघी खामगाव नगरी राम मय झाल्या चे मिळाले. श्री राम लला प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त शहरातील सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने श्री ओंकारेश्वर मंदिर येथे आज संध्याकाळी भव्य दिव्य दीपोत्सवा व महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी ६ वा महाआरती करून लाडू प्रसाद वाटप करण्यात आले नंतर ५००० दिवे लावून भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी , वि. हिं परिषद.बजरंग दल विभागीय सह मंत्री,अमोलजी अंधारे, पवनजी गरड, लक्ष्मणराव गाडे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा.गुरूव्दारा संचालक जितेंद्र सिंग मेहरा, मोठी देवि मंडळ संचालक रवि आनंदे, दिलीप झापर्डे, विनोद सुकाळे,अरूण कडवकर,प्रशांत आवटे, दादु अंधारे, विक्की देशमुख,लालाजी सांगळे. अशोक आनंदे.सचिन केवारे, दिलिप जोगदंड,गजानन उंबरकर, रामदास ढोले, सागर चुंबळकर, राजपाल यादव,अशोक मोरे,विनोद महाडिक, अशोक मोरे,शांताराम मंडवे,आशाबाई अंधारे.सुशिलाबाई आवलकर,पार्वता सुकाळे,जया सुकाळे,मंगला बावस्कर. शकुंतला ढवळे. जयश्री झापर्डे, संगिता देशमुख,वर्षा देशमुख,प्रमिलाबाई शिंदे, निता अंधारे, सोनाली शिंदे,निकिता पवार, अर्चना ढवळे,जान्हवी डोंगरकर,अंजली पवार,ज्योती डोंगरकर,सुनिता साळुंखे,पुजा डोंगरकर,कामिनी शिंदे,अमृता तायडे,आस्था सोळंके,वैशाली कोडलिंगे,जान्हवी शर्मा,आराध्या ढोले,ऊषा शर्मा,प्राची कोडलिंगे, किर्ती शर्मा,संगिता तायडे,मंगला सोळंके, शुभांगी विटे, मनिषा पवार, आशा दिपके, आराध्या ढवळे,तसेच शिवाजी नगर. सतिफैल भागातील शेकडो महिला पुरूषांची उपस्थिती होती सन २००० मध्ये संस्थापक अध्यक्ष देविदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांनी भजनी मंडळाची स्थापना करून आज पर्यंत अखंड पणे धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ भावनेतून सतत ” मुख मे हो राम नाम, राम सेवा हाथ मे ” हे ध्येय घेऊन सतत मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहेत अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली.