दि. 21
मलकापूर: पोलिस स्टेशन येथे शेतकऱ्यांनी मलकापूर येथील सुप्रसिद्ध डॉ. प्रफुल पाटील याच्या आरंभ ट्रेडिंग कंपनीला आपला शेतमाल काही दिवसाच्या वायद्यावर दिला होता. शेकडो शेतकऱ्याचा कोट्यवधी चा शेतमाल नोटरी करून चेक देऊन घेण्यात आला होता.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव काटा पद्दी सुद्धा आहेत परंतु शेतमाल चे पैसे न देताच आरंभ ट्रेडिंग कंपनी चे मालक पसार झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला डॉ. प्रफुल पाटील यांच्या विरोधात 420 चा गुन्हा दाखल केला होता .
परंतु आज वर पोलिसांची काही हालचाल दिसत नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी आमदार राजेश एकडे याच्या कडे न्याय मागितला तेव्हा शेतकरी यांच्या सोबत खरोखरच खूप मोठा अन्याय होत आहे अहोरात्र मेहनत करून शेतकरी बाजारपेठेत आपला शेतमाल विक्रीला आणतो त्यावेळी जास्त भावाचे आमिष देऊन शेतकऱ्यांना लुटल जाते हा शेतमाल मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे समोर विकला जातो व आरंभ ट्रेडिंग कंपनी सारख्या नवीन कापूस खरेदी केंद्र येथे जास्त भावाने घेतल्या जातो.
तरी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी कास्तकारांच्या होणाऱ्या फसवनूक वर चूप का बसतात म्हणून कास्तकारांच्या शेतमालाचे पैसे देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ही जबाबदार आहे असे विधान आमदार राजेश एकडे यांनी केले. त्यावेळी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव जाधव यांना सुद्धा बोलावून आमदार राजेश एकडे यांनी धाऱ्यावर घेत कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव नात्याने त्यांची जबाबदारी काय याची समज दिली.
तसेच यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी मदत लागेल मी करण्यास कटिबद्ध आहे व त्यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक विधी तज्ञ सुद्धा शेतकऱ्याच्या मागणीवरून स्वखर्चाने देतो असे वचन दिले.