कृषीविदर्भ विभाग

चिखलदरातील शेतकऱ्यांना ज्वारी पिकाचा आधार

चिखलदरा तालुक्यातील तिन्ही मंडलांतील शेतकऱ्यांनी ज्वारीच्या उन्हाळी सुधारित वाणाची पेरणी केली. शेतात डोलत असलेले हिरवेगार ज्वारीचे मोत्यासारखे कणीस या भागातील शेतकऱ्यांना जगण्याचे एकप्रकारे बळ देत आहे.यंदा १३५ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे.गत काही वर्षांत विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या ज्वारी पिकाकडे पाठ फिरवली होती. मात्र आता पुन्हा खरिपाऐवजी रब्बी, उन्हाळी हंगामात ज्वारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा चिखलदरा तालुक्यातील तीन मंडलांत १३५ हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली आहे.

खानदेशात दादर ज्वारीची आवक वाढलीसध्या गव्हापेक्षा ज्वारी खाण्याकडे शहरी नागरिकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळेच गव्हाच्या तुलनेत ज्वारी भाव खात आहे. तसेच पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई भेडसावत आहे. चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झालेला आहे. या ज्वारीच्या पिकापासून जनावरांनादेखील चारा मिळत आहे.

रब्बी हंगामात ज्वारीने घातलीय भुरळ

अंबापाटी, गिरगुटी, मलकापूर, टेम्ब्रूसोंडा या परिसरात यंदा ज्वारीची लागवड आहे. या भागात बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीचे पीक घेतले आहे. कडब्याची कुट्टी मिळणार आहे. विशेष म्हणजे, बहारदार व हिरवेगार उभे असलेले ज्वारीचे पीक येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधत आहे.लहूदास आळे, कृषी अधिकारी, चिखलदरापूर्वी ज्वारीचे क्षेत्र अधिक राहत असल्याने चाराटंचाई भेडसावत नव्हती. आता पुन्हा धान्याच्या उद्देशाने शेतकरी ज्वारीकडे वळू लागले. त्यामुळे तालुक्यात यंदा रब्बीत सुमारे १३५ हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. त्यामुळे चाराटंचाईतून काहीसा दिलासा मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!