बुलढाणा:जिल्ह्यात सोसाट्याच्या वार्यासह झालेल्या अवकाळी पावसाने 1 हजार 86 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके व फळबागांना तडाखा बसला आहे. एकूण 48 गावातील 1086.50 हेक्टरवरील पिकांचे नुकसान अहवालात प्राथमिक माहिती कृषी अधीक्षक जिल्हाधिकारी मनोज ढगे यांनी किरण पाटील यांना हा अहवाल सादर केला आहे.15 फेब्रुवारीच्या संध्याकाळी व रात्री अवकाळी पावसाने वार्यासह जिल्ह्यात हजेरी लावली.
बुलढाणा, खामगाव व नांदुरा या तालुक्यात अवकाळीचा जोर जास्त होता. कृषी विभागाने आज शुक्रवारी केलेल्या पाहणीत या तालुक्यातील 48 गावांना फटका बसल्याचे दिसून आले. तसेच 1 हजार 86 हेक्टर क्षेत्रावरील गह, रब्बी ज्वारी, हरभरा व मका या पिकासह फळबागांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक तडाखा बसलेल्या बुलढाणा तालुक्यात 405 हेक्टरवरील गहू, शाळू, मका व हरभरा या पिकांची नासाडी झाली, तालुक्यातील 13 गावांतील शेतकरी बाधित झाले आहे. खामगाव तालुक्यातील 20 गावातील 375 हेक्टरवरील फळबागा गहू, हरभरा, मक्याचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यातील 15 गावातील 360.50 हेक्टर क्षेत्रातील केळी, लिंबू, गहू, मका, ज्वारी पिके बाधित झाली.