मलकापूर (प्रतिनिधी) :एका अनुसूचित जातीच्यामहिलेला जातीवाचक शिविगाळ करून गावातून काढून देण्याची व घर उद्धवस्त करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिलीप सोपान इंगळे रा. हरणखेड ता. मलकापूर याचे विरूध्द अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 3 (1) (आर), 3 (1) (एस), 3 (2) (व्हीए) 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वा. दरम्यान घडली.फिर्यादी सौ. ज्योती निवृत्ती इंगळे (वय 40) रा. हरणखेड ता. मलकापूर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी व माझी आई गावातील महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतांना गावातीलच दिलीप सोपान इंगळे याने आमच्या मागे मोटार सायकल घेऊन मला जातीवाचक शिविगाळ करून गावात कसे राहता, तुमचे गावातून घर उद्ध्वस्त करतो, तुम्हाला गुडघे टेकायला लावतो, आठ दिवसात गाव सोडायला लावतो अशा धमक्या दिल्या. माझे पती व मुलगा नेहमी शेतात एकटे-दुकटे जातात. त्यांच्या व माझ्या परिवारास जिवाला भिती निर्माण झाली असल्याचे तक्रारीत नमूद असून या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी दिलीप सोपान इंगळे रा. हरणखेड याचे विरूध्द अप.न. 38/2024 कलम अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी हे करीत आहेत.
Related Articles
Check Also
Close
- नांदेडमध्ये खळबळ! ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचे बोट..October 2, 2024