कारंजा/प्रतिनिधि
भारतीय बौद्ध महासभेची निर्मिती करीत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी एक ध्येय नीचित केले होते, त्यांनी आपल्या समाजाला,सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक संपन्नता प्रदान करून भारताला सम्राट अशोकाचा बौद्धमय भारताची निर्मिती करण्याचा संकल्प हाती घेतला होता. मात्र बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण नंतर त्याच्या वारसांनी स्वतःला आत्मकेंद्री करून ही चळवळ नष्ट केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या स्वप्नाचा चुराडा केला. त्यामुळे आपल्याला आता फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या स्वप्नाला पूर्णत्वास नेण्यासाठी बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणे हे माझे ध्येय असल्याचे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर दि. 27 जानेवारी 2024 रोजी स्थानिक शेतकरी भवनात आयोजित बौद्धांची स्वातंत्र्य व्यवस्था निर्माण परिषदेला संबोधित करताना केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर होते. या परिषदेचे उद्घाटन माजी नगररचनाकार अधिकारी प्रकाश रविराव हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून पँथर चळवळीचे शिलेदार रा. ना. अंभोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंते. प्रदेश सचिव सिध्दार्थ गायकवाड, संघटक वैभव धबडगे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष काशिनाथ अंभोरे, बहुजन पत्रकार संघटना वाशिम चे जिल्हा अध्यक्ष बंडूभाऊ इंगोले, बहुजन समाज पार्टी कारंजा मानोरा विधानसभेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. अशोक जाधव, झील इंटरनॅशनल स्कूलच्या सचिव चेतनाताई मेश्राम, माजी वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ देवरे, राहुल रविराव, हरेंद्र ठोंबरे उपस्थित होते. दीप प्रज्वलन व त्रिशरण पंचशीलाने परिषदेची सुरुवात करण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणात राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की, बौद्धांच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक उन्नतीची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अंतर्भूत केली होती. परंतु बौद्धांप्रती द्वेष असणाऱ्या सरकारांनी ही व्यवस्था उभी करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे आपल्याला सरकारच्या मर्जीवर अवलंबून न राहता पुढे आले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून बौद्धांनी आपली आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अधिकोष निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या आधारावर आपण शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय विकासाला प्राप्त करू शकतो. हे माझे मत नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे मत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. माझ्या आवाहनाला आपण प्रतिसाद द्यावा अशी विनंती त्यांनी याप्रसंगी केली. प्रकाश जी रवीराव,सिद्धार्थ देवरे, रा. ना. अंभोरे, दिनेश हनुमंते, वैभव धबडगे यांनी आपले व्यक्त मनोगत व्यक्त केले. दरम्यान बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या सन्मानार्थ डॉ. आंबेडकर चौक ते शेतकरी निवास पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
समता सैनिक दलाच्या महिला विंग ने रॅलीचे यशस्वी नियोजन केले. परिषदेचे प्रास्ताविक बंडूभाऊ इंगोले यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वासुदेव भगत यांनी केले तर आभार प्रोफेसर डॉ. अशोक जाधव यांनी मानले. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक म्हणून सागर राणा अंभोरे, रंगराव शेजव, छत्रपती मनवर, प्रा. रामदास देवळे,यशवंत साऊंदकर, पद्माकर गुलदे, संजय हुमणे, अजय मोटघरे, राम शेजव,समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर याच्या अर्मपाली पाढेन,संघमित्रा हिवराडे, बेळखेडे मॅडम यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र 24या युब ट्यूब चॅनल द्वारे देशभर कार्यक्रम लाईव्ह प्रसारित करण्यात आला होता त्यासाठी विनोद गणवीर आणि मोनाली गणवीर यांनी अथक परिश्रम घेतले जिल्हाभरातून हजारो आंबेडकरी अनुयायांनी सदर कार्यक्रमाला स्वयम् स्फुर्तीने हजेरी लावली होती.