जांभुळधाबा ( मलकापुर /प्रतिनिधी) येथील श्रीकृष्ण मंदिर सभामंडप आमदार राजेश एकडे साहेब यांच्या निधीतुन 15 लक्ष रुपये खर्च करून सभामंडप पुर्ण झाल्याबद्दल लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत सभापती चे माजी सभापती विनायकराव जवरे हे होते.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शिरीष डोरले , बुलढाणा जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील , मलकापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बंडूभाऊ चौधरी , मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजु पाटील , प्रवीण क्षीरसागर , एडवोकेट उज्वल पाटील , तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा प्रीती ताई भगत प्रवीण पाटील शिरसागर अनंता पाटील यांच्यासह मंचावर उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायकराव जवरे यांनी आमदार साहेबांना सांगितलेल्या विषयाच्या अनुषंगाने ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीनुसार आमदार राजेश एकडे साहेबांनी या मंदिरासाठी अगोदर दहा लक्ष रुपये निधी मंजुर केला होता परंतु तो दहा लक्ष रुपये निधी कमी पडत होता.त्याच्यानंतर परत ग्रामस्थांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी भेटून आमदार साहेबांना विनंती केली की हा निधी आपल्याला कमी पडतो आहे या निधीमध्ये अजून थोडीशी वाढ करून या कार्यक्रमाचे या सभागृहाचे बांधकाम व्यवस्थित रित्या पुर्ण होऊ शकते. म्हणून आमदार साहेबांनी परत त्यामध्ये निधी वाढवून ते पंधरा लाखापर्यंत हे सभागृह पुर्ण करून दिलेले आहे. आमदार राजेश एकडे साहेब यांच्यामुळे आजचा हा आपला सभामंडप पुर्ण झालेला आहे भविष्यातही आपल्या गावातील ज्या काही समस्या असल्या त्या समस्या त्याचप्रमाणे गजानन महाराजांच्या मंदिरासाठी त्यांनी आपला निधी अजून द्यावा आणि आपल्या त्या गजानन महाराजांच्या मंदिराचा सभामंडप बनवुन देण्यासंदर्भात त्यांना विनंती केली. श्री राजेश एकडे यांनी यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की माझ्याकडे राजू जवरे यांच्या माध्यमातून गावातील प्रमुख नागरिक या श्रीकृष्ण मंदिराच्या संदर्भात मी गावात जांभुळधाबा गावात आलो असताना त्यांनी या विषयाच्या संदर्भात माझ्यासोबत चर्चा केली मी तात्काळ त्यांना त्या विषयाच्या संदर्भात काम करण्याचे आश्वासन दिले आणि ते पुर्णत्वास नेऊन आज या मंदिराचा लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते होत आहे याचा मला परिपुर्ण आनंद आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणखी जांभुळधाबा या गावासाठी माझ्या निधीतुन आपण येणाऱ्या एप्रिल महिन्याच्या नंतर श्री. संत गजानन महाराज मंदिराच्या समोर सुद्धा 25 लक्ष रुपये निधी देऊन अवाढव्य असं सभागृह बनवुन देण्यासाठी मी आश्वासित करतो. मी या कार्यक्रमाला उपस्थित राहील आणि कार्यक्रमाची आपण शोभा वाढवावी ही विनंती करतो आणि मला या ठिकाणी बोलवुन माझा यथोचित सन्मान केला व लोकार्पण सोहळा संपन्न झाला अस मी जाहीर करतो. या कार्यक्रमाच्या प्रसंगी जांभुळधाबा येथील नागरिक मोठ्या उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन जांभूळ ढाबा येथील मलकापूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजु जवरे यांनी केले होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल मुंधोकार यांनी केले.